पुणे शहरात स्वातंत्र्य सेनानी हजरत टीपू सुलतान यांच्या विटंबनेच्या निषेधार्थ करमाळा येथे निवेदन
पुणे शहरातील दत्तनगर भागात स्वातंत्र्य सेनानी शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमान जनक शब्द वापरून त्यांची विटंबना करून समस्त मुस्लिम समाज आणि अनेक भारतीयांच्या भावना दुखावणाऱ्या व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती विरोधात कडक कारवाई करणे बाबत. आज करमाळा येथे सकल मुस्लिम समाज करमाळा शहर व तालुका यांच्या वतीने करमाळा तहसीलदार आणि करमाळा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना करमाळा शहरातील श.ह.टिपु सुलतान बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष - सुफरान शेख,श.ह.टिपु सुलतान बहुउद्देशीय सामाजिक संस्था सचिव - अफजल शेख,युवा सेनेचे जिल्हा सचिव - सोहेल पठाण, अल सहारा ग्रुपचे अध्यक्ष - तोफिक शेख,मुस्तकीम पठाण, पै. अमीन बेग, युसुफ शेख, अमर शेख, शाहरुख नालबंद, अजीम पठाण, भैय्या पठाण, राजू पठाण, साजिद (बिल्डर) तांबोळी, नाजीम खान, अबू बागवान, शाहरुख शेख, मोहिदिन बागवान व मुस्लिम समाजातील बहू संख्य नागरिक उपस्थित होते.