Posts

Showing posts from January, 2022

ॲट्राॅसिटी कायद्यातील बदल विरोधात महाविकास आघाडी चा निषेध- नागेश दादा कांबळे

 ॲट्रॉसिटी कायद्यातील बदल विरोधात महाविकास आघाडी चा निषेध-मा. नागेश दादा कांबळे करमाळा (प्रतिनिधी राजु सय्यद )            रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा. नागेश (दादा) कांबळे यांच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यातील प्रस्ताविक बदल करणेबाबत च्या विरोधात तालुका करमाळा माननीय तहसीलदार साहेबांना पत्र देण्यात आले.             अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट -अ)व सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट- ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विधी व न्याय विभाग व गृह विभागाच्या विचाराधीन असल्याचे निदर्शनास आलेले आहे.             अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचाराच्या घटनांचे थैमान माजलेले असताना हा कायदा अधिक कसोशीने पाळला गेला पाहिजे तरी कायद्यातील बदल करणारी प्रक्रिया त्वरित रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. ...